मन केले ग्वाही
‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ या विषयावर ऑक्टोबरचा विशेषांक काढायचा संपादकांचा मानस आहे. नास्तिक्य हे केवळ देवाला नाकारण्यातून आलेले नसून अफाट वाचन, अभ्यास, विज्ञानाशी त्याची सांगड, चिकित्सा असे सारेच त्यामागे असते, असे त्यांचे म्हणणे आहे. “बुद्धिप्रामाण्यवाद हा समस्त सृष्टीसाठी हितकारक आहे” अशी ह्या अंकाची मध्यवर्ती कल्पना असावी असे त्यांनी ठरवले आहे. समस्त सृष्टीपेक्षा मनुष्यसमाज असे संपादकांना म्हणायचे आहे …